औरंगाबाद : सातारा परिसरातील सकलानगरात जाण्यासाठी बीड बायपास रोडवरून आत येणाऱ्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे . त्यामुळे नागरिकांना रोज चिखलातून वाट काढावी लागते . देवळाई चौककडून एमआयटीकडे जात असताना डाव्या बाजुला साकलानगर वसाहत आहे . या भागाकडे जाण्यासाठी असलेला अंतर्गत रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे . जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे . नागरिकांना छत्रपतीनगरच्या कमानीकडून वळसा घालून या भागाकडे जावे लागते . मनपाकडून सदर रस्त्याचे काम होणार असल्याचे आश्वासने उधळलली जात आहेत . परंतु , अद्यापही या रस्त्याचे काम झाले नाही . या चिखलमय रस्त्याने वाहनेसुध्दा घसरून पडत आहेत . नागरिकांना पायी चालणेदेखील शक्य नाही . त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत करावे , यासाठी संजय खांडळीकरसह नागरिकां निवेदन दिले आहे . साकलानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाला असून पाण्याचे डबके साचले आहे