परभणी(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आज रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजता झरी या गावी भेट देऊन शेतकरी माणिकराव सावंत यांच्या लम्पी राेगाने आजारी असलेल्या जनावराची पाहणी केली. यावेळी परभणीचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव व झरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय धमगुंडे यांनी परिसरातील व जिल्ह्यातील लंपी राेगप्रादुर्भाव तसेच लसीकरणाच्या सद्यस्थिती बद्दल विस्तृत माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील कार्यवाहीबद्दल मार्गदर्शन व सुचना दिल्या. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांचे झरी येथे स्वागत करताना जि.प. सदस्य गजाननराव देशमुख, झरी ग्रामपंचायतचे सरपंच दिपकराव देशमुख, उपसरपंच महेश महाराज मठपती, सुरेशअन्ना देशमुख, सत्तारभाई कुरेशी, संताेष देशमुख, बाळासाहेब जगाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते.