गोरेगाव येथे लोकप्रतिनिधी चा जाहीर निषेध व्यक्त,शेतकऱ्यांनी जाळले टायर.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावे अतिवृष्टी अनुदान अनुदान यादी मधून वगळण्यात आले आहे सेनगाव तालुक्यातही चार मंडळाचा समावेश करण्यात आला नाही बाबुळगाव गोरेगाव आजेगाव पुसेगाव या चारही मंडळाचा समावेश अतिवृष्टी अनुदान यादी मध्ये झालेला नाही तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा फोल ठरले आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची मागणी सुद्धा करण्यात आली एवढ्याच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शेतकऱ्यांसाठी घोषणा या निष्फळ ठरले आहेत शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावे विज बिल माफी करावी अनुदानातून वगळलेल्या मंडळाला पुन्हा समावेश करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्या संदर्भात दिनांक 15 सप्टेंबर रोजी तलाठ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने आज शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस असून गोरेगाव येथील हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील भैया पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या पाटील , गजानन प्रकाश कावरखे यांच्या सह परीसरातील शेतकऱ्यांनी बेमुदत संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या बेमुदत संपाला अजून ही भेट दिली नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले .