भोकरदन :ग्रामीण श्रीराम पुंड हे शुक्रवारी सायंकाळी घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला . मात्र , ते कुठेही मिळून न आल्याने भोकरदनहून सिल्लोडकडे जाणाऱ्या मार्गावरील एका विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मुलांनी घटनास्थळी धाव घेतली . दरम्यान , मृतदेह बाहेर काढण्यात आला . त्यानंतर भोकरदन येथील रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला . सदर घटनेची भोकरदन पोलिसांत नोंद केली असून , तपास के . बी . दाभाडे व अनिल जोशी करत आहेत . दरम्यान , श्रीराम पुंड यांच्यावर त्यांच्या शेतात पुंडवाडी येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , एक विवाहित मुलगी आहे . कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली . ही घटना शनिवारी भोकरदन सिल्लोड श्रीराम पुंड मार्गावरील भारत गॅस एजन्सी परिसरात समोर आली . श्रीराम पांडुरंग पुंड ४५ , रा . पुंडवाडी , ता . भोकरदन असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे . श्रीराम पुंड पुंडवाडी शेतात वास्तव्यास असून , स्वतःकडील एक दीड एकर जमिनीची मशागत करून इतरांच्या शेतात रोजंदारीवर उदरनिर्वाह करत होते . शेतीवर घेतलेले कर्ज व इतर दोन खासगी बँकेच्या कर्जाच्या तगाद्याने ते चिंताग्रस्त होते

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं