सोडा घेऊन जाणारा ट्रक पलटी

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"पैठण तालुक्यातिल आडगाव जावळे शिवारातील घटना"

पाचोड(विजय चिडे) कपडे धुण्याच्या सोडा घेऊन ट्रक धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जाळे ता.पैठण शिवारात मालवाहतूक ट्रक चालकांने वळणावर ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ताच्याकडेच्या नालीत जाऊन पलटी झाल्याची घटना रविवारी (दि.१८)रोजी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की,औरंगाबादकडून बीडकडे कपडे धुण्याच्या सोड्याच्या गोण्यां घेऊन जाणारी मलावाहतूक

ट्रक क्रमांक (एम.एच.18 एए.9556) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात ट्रक चालकांचे वळणावर अचानक ट्रकवरील नियंत्रण सुटले त्यामुळेही ट्रक रस्त्याच्याकडे असणाऱ्या नाली जाऊन पलटी असून यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून जिवीत हानी झाली नसून ट्रकमात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताचा काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक मधील चालकांस सुरक्षित बाहेर काढून त्यास या अपघातात संदर्भात विचार पूस करून तो चालक किरकोळ जखमी झाल्याने त्यास पाचोड येथे उपचारासाठी दाखल केले होते.