जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करावा असे आवाहन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बाळू(भाऊ) शिनगारे यांनी केले आहे.
बीड जिल्हात मागील काही महिन्यानपासून निसर्गाच्या आवकृपेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी दुष्काळ तर कध अतिवृष्टीला सामोरे जावे लागले आहे. त्याचा अत्यंत वाईट परिणाम शेतातील उभ्या असणाऱ्या मूग उडीद सोयाबीन कापूस इत्यादी पिकावर दिसून येत आहे. शेतातील पिकांचे जवळपास पन्नास तक्कयांच्या पुढे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडावे .
वेळेवर पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांचा विमा कंपनी वरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आता शेतकऱ्यांचा आंत पाहू नये नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे पत्रकात बाळू शिनगारे म्हटले आहे .सदरील पीक विमा लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे अदा व्हावेत अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बाळू (भाऊ) शिनगारे यांनी केले आहे .