मुंबई: लवकरच मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण होणार असून या महामार्गावर नेमका किती टोल असणार याची माहिती देणाऱ्या फलकाचा फोटो व्हायरल झालाय. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता असून या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास 8 तासात पूर्ण करणाऱ्या महामार्गावर वाहनांना टोल किती असणार याची माहिती आता समोर आली आहे. टोल दराची माहिती देणारे फलक महामार्गावर लावण्यात आले असून 2025 पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत. नागपूर ते मुंबई असा थेट ७०१ किमी अंतरासाठी जवळपास १२०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

जाणून घ्या समृद्धी महामार्गावरील दर पत्रक...

 चार चाकी वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये प्रति किमी, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रति किमी, बस, ट्रकसाठी ५.८५ रुपये प्रतिकिमी,तीन आसनी व्यावसायिक वाहनांसाठी ६.३८ रुपये प्रतिकिलोमीटर अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी ९.१८ रुपये अतिअवजड वाहनांसाठी (सात किंवा जास्त आसांची वाहने) ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या १२ जिल्ह्यातून जात आहे.