सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी विविध मागण्या संदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात येत आहे. तर या संपाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी भेट देऊन सर्व शेतकऱ्यांना दिलासा देऊन शेतकऱ्यांच्या संपला पाठिंबा असल्याचे सांगितले. यावर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अतिवृष्टी निधी मंजूर करण्यात आला आहे.मात्र या अतिवृष्टी निधीमधून सेनगांव तालुक्यातील गोरेगांवसह काही मंडळे वगळल्याने शेतकऱ्यांनी गोरेगांव या ठिकाणी संप पुकारला आहे.तर या संपाला आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप देशमुख यांनी भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे.