वसमत तालुक्यातील गिरगांव येथील शेतकऱ्यांनी आज महावितरण कंपनी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारले आहे.तसेच यावेळी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला होता.तसेच यावेळी संबंधित अधिकारी यांनी लेखी आश्वासन देण्याचे सांगितले परंतु शेतकऱ्यांनी मात्र प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन पाहणी करण्याची मागणी केली आहे.तर यावेळी गिरगाेव परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.