*आनंद विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा*

   आनंद विद्यालयात 74वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्था अध्यक्ष एकनाथ कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

   मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास विक्रम भांडवलकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.तर अध्यक्ष एकनाथ कदम यांनीही मराठवाडा मुक्तीसंग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल माहिती सांगितली.

     या कार्यक्रमाचे औचित्य साधून नीट परीक्षेत 569 गुण घेऊन घवघवीत यश मिळवलेली विद्यालयाची विद्यार्थिनी कु.भक्ती भानुदास कदम हिचा अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कदम यांनी तर आभारप्रदर्शन नारायण सागुते यांनी केले.

  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.