परतुर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 10/08/2022 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय परतुर तहसील कार्यालय परतुर तसेच नगर परिषद परतुर येथे पारधी वाड्यातील वास्तव्यास असणाऱ्या गोरगरीब जनता यांना रस्त्याची सोय नाही त्याच प्रमाणे ते ज्या जागेवर राहत आहेत त्यांना नमुना नंबर आठ नाही घरकुल नाही या अनेक प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीने वार्ड क्र चार मधील पारधी समाजाचा प्रश्न घेऊन उपविभागीय अधिकारी परतुर तहसील कार्यालय परतुर तसेच नगर परिषद परतुर यांना निवेदन दिले होते व ऍड सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री यांना ई-मेल करून पाठपुरावा करीत राहिले ऍड सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व रविंद्र भदर्गे वंचित बहुजन आघाडी परतुर तालुका अध्यक्ष यांच्या 10/08/2022 ला दिलेल्या निवेदनाला अखेर यश मिळाले आज दिनांक 17 /09 /2022 रोजी दखल घेऊन ऍड सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक वार्ड क्र चार मधील समस्त नागरिक यांच्या पारधी वस्तीत माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय  सुधीर गवळी साहेब यांनी वार्ड क्र चार मधील जाऊन पारधी वस्तीच्या रस्त्याची नाल्याची लाईट स्वच्छता ग्रहाची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत बातचीत करतांना समस्त पारधी समाजाचे नागरिक व ऍड सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी ऍड सुरेश काळे यांना मंगळवारी वार्ड क्र चार मधील एक समिती गठीत करून तेथील रहिवाशांचे नमुना नंबर 8 चा प्रश्न व आणखी इतर प्रश्न असेल यासाठी एक समिती स्थापन करून मंगळवारी भेटण्यास बोलावले आहे