औंढा नागनाथ येथून मतदान केंद्राकडे अधिकारी व कर्मचारी रवाना

औंढा नागनाथ तालुक्यातील चार ग्रामपंचायत साठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय येथून साहित्यासह मतदान अधिकारी यांना मतदान केंद्रस्थळावर रवाना करण्यात आले यावेळी निवडणुकी विभागाचे तहसीलदार सचिन जोशी,अवल कारकून शैलेश वाईकर, शरद नाईक नवरे भगवान घुगे अनिल पाथरकर आदींसह मतदान कर्मचारी व बंदोबस्तावरील कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.