औरंगाबाद :- (दीपक परेराव )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत २ दिवस होते.यावेळी मराठा क्रांती मोर्च्यांच्या वतीने जळगांव येथील एल.सी.बी.च्या पी.आय. किरण बकाले यांस तात्काळ शासन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले.

 या निवेदनात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील राज्य पोलीस सेवेमध्ये असलेल्या एल. सी. बी. चे पी.आय किरण बकाले याने त्याच्या विभागातील कर्मचायासोबत मोबाईल संभाषणामध्ये मराठा समाजाच्या आया-बहिणींची शब्द रूपाने विटंबना व विनयभंग केला आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद असून त्यांनी केलेले वक्तव्य सोशल मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियात व्हायरल झाले आहे.

सदरील व्यक्ती हा महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये महत्त्वाच्या पदावर असून त्याने केलेले वक्तव्य जाणीवपुवर्क आहे. तरी त्यास तात्काळ बडतर्फ करून भारतीय दंड संहिता कलम 295, 354, 504, 505. 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे.

मराठा समाजाबद्दल त्याच्या मनात किती तिरस्कार आहे. हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे सदरील व्यक्तीने मराठा द्वेषभावनेने त्याच्या पदाचा गैरवापर करुन मराठा समाजबांधवांना खोट्या गुन्ह्यात अडकवलेले नाकारता येत नाही. त्यामुळे किरण बकाले यांच्या कारकिर्दीत दाखल गुन्ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे. तरी साहेबांना मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे की, त्यास तात्काळ बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, ही विनती, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व यास सर्वस्वी महाराष्ट्र सरकार व प्रशासन जबाबदार राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असे या निवेदनात म्हंटले आहे.