चौसाळा बसस्थानकासमोरील हातभट्टी अड्डयावर कारवाई का नाही ?

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथे अवैध दारू विक्री मोठया प्रमाणावर होत असुन अनेक वेळा नेकनुर व चौसाळा पोलीस प्रशासनाने कारवाई करून देखील येथील अवैध दारू विक्री बंद होत नसुन भरवस्तीत हातभट्टी दारू विकली जात असतानाही दारू बंदी विभाग याकडे माञ डोळेझाक करत असल्याचे दिसुन येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील चौसाळा येथे अवैध दारूचे दुकाने मोठया प्रमाणावर चालवली जात असुन भरवस्तीत अवैध दारू विकली जात असुन या अवैध दारूविक्री विरोधात चौसाळा पोलीसांनी मोहीम हाती घेतली असुन पंधरा दिवसापूर्वीच एका अवैध हातभट्टी अड्डयावर चौसाळा पोलीसांनी कारवाई केली होती आज पुन्हा भरवस्तीत चालणारया हातभट्टी दारू अड्डयावर चौसाळा पोलीसांनी धाडसी कारवाई करून दोनशे लिटर रसायन व शंभर लिटर गावठी हातभट्टी दारू अड्डयावर कारवाई केली या कारवाई दरम्यान चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अमंलदार बाबासाहेब डोंगरे, पो, ना,बळवंत साहेब, पो,ना, पुंडे साहेब, पोलीस कर्मचारी देशमुख यांनी केली.