राज्याचे मंत्री सुधीर मनगुंटीवार यांचे औंढा नगरीमध्ये जंगी स्वागत
औंढा नागनाथः- महाराष्ट्र राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता औंढा नगरीमध्ये पाटील कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रि औंढा शहरात येतात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.औंढा शहरातील पाटील कॉम्प्लेक्स समोर त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य पांडुरंग पाटील, कामगार युवा प्रदेश सचिव शरद पाटील ,मा. नगराध्यक्ष दिपाली पाटील, नगरसेविका अश्विनी पाटील, गणेश पाटील, सखाराम इंगळे, माऊली कदम ,सर्जेराव दिंडे, बबन सोनुने , राजु गिरी,सुनील देशमुख , महेश जोशी, विठ्ठल पाटील ,राणा पाटील,नागेश पाटील ,गणेश मेहता ,प्रशांत स्वामी आदी भाजपा कार्यकर्ते सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, इमरान पठाण, राजकुमार सूर्वे , गणेश गायकवाड ,माधव सूर्यवंशी यांनी कडक बंदोबस्त दिला होता