भाजपा युवा मोर्चाच्या वतीने औंढा शहरात रक्तदान शिबिर, 101 रक्तदात्यांनी केले रक्तदान
औंढा नागनाथः- शहरांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा तालुका भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंचकराव कदम यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .या रक्तदान शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी दिवसभर रक्तदान केले .या रक्तदान शिबिराप्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा प्रल्हाद कदम, जिल्हाध्यक्ष व्यापारी सतीश सोमाणी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंचकराव कदम, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख माऊली कदम, प्रा. गजानन कुटे, नागनाथ राखे, राजु आहेर, रावसाहेब अंभोरे ,किरण राखोंडे , माऊली जाधव, माऊली कदम, अंगद गारकर, विक्की ठाकूर, विठ्ठल सांगळे, महादजी पावडे, दत्ताञय रवंदळे ,गजानन गरड ,रामकिसन उदास आधी भाजपा कार्यकर्ते या रक्तदान शिबिराला उपस्थित होते. रक्त संकलन करण्याचे काम आर डी दुधाळकर (अधीक्षक), डाँ एस टोम्पे, पवन इंगोले, गंगाराम कोरुडे, किशोर ठाकरे जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली यांनी केले. रक्तदान शिबिराचे आयोजन मंचकराव कदम तालुकाध्यक्ष युवा मोर्चा भाजप औंढा नागनाथ यांनी केले होते.