परळी प्रतिनिधी. प्रसिद्ध बाल साहित्यिक तथा कवी, गीतकार भगवान पी.गरड यांना परळी मराठवाडा साहित्य परिषदेचा साहित्य गौरव पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

    शहरातील बाबा रामदेव मंदिरात काल सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी मसाप शाखेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर, मराठवाडा शिक्षण संघाचे सूर्यकांत विश्वासराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर नरेंद्र काळे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, लोकमान्य पतसंस्थेचे चेअरमन पी. एस. घाडगे, पत्रकार लक्ष्मण वाकडे, शिक्षक नेते बंडू आघाव, तुळशीराम पवार आदी उपस्थित होते.

    कवी भगवान गरड हे शब्दशिल्प मासिकाचे संपादक आहेत. त्यांचे लहान मुलांसाठी विशेष साहित्य प्रकाशित आहे. त्याबरोबरच शिवशक्ति गीतमाला, पुस्तिका,समतेची ज्योत गीतसंग्रह, 'सुगंधी तेलाचा उद्योग ' ही तरुणांसाठी मार्गदर्शक पुस्तिका याचबरोबर 'चिऊ' हा बालकविता संग्रह, भगवान बुध्दपाठ कविता सार. 'निळकंठ' प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे संपादक कथा पटकथा लेखन तसेच *'गालावरचा तिळ' आणि लोकनेते गोपनाथ मुंडे साहेब गाजले देशा मध्ये 'तुफानातली दिवे' हे गीतांचे अल्बम प्रसिध्द आहेत.

      कविरत्न सम्मान पुरस्कार प्रदान. 'हायकू भीमाचे' प्रातिनिधिक हायकूसंग्रत काही हायकू प्रसिध्द झाले आहेत. त्यांच्या या साहित्य प्रवासाची दखल घेऊन मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीने दखल घेऊन त्यांना 2022 या वर्षासाठी दिला जाणारा साहित्य सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल प्रसिद्ध आबासाहेब वाघमारे, प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार रानबा गायकवाड, लेखक, दिग्दर्शक प्राध्यापक सिद्धार्थ तायडे, लेखक अजय कुमार गंडले, नगरसेवक गोपाळ आंधळे, पत्रकार संजय खाकरे, दत्ता वालेकर, नागनाथ बडे, साहित्यिक तुकाराम खिल्लारे, उद्धव दिवे, सिद्धेश्वर इंगोले, बालाजी कांबळे, संतोष नारायणकर परळी मसपा, नवथर साहित्य मंडळ आदींनी अभिनंदन केले आहे.