आयआयटी पूर्वपरीक्षेत श्रावण बड गुजरचे यश सिल्लोड शहरातील रामकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी श्रावण योगेश बडगुजर याने देशातून २७८ वा क्रमांक घेत आयआयटी परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले . श्रावण याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक विठ्ठलराव पाटील संस्थेचे सचिव अभिनंदन पाटील संस्थेचे संचालक अजिंक्य पाटील शाळेचे प्राचार्य वाय . के . सायगळ , उपप्राचार्य कैलास मुरमे आदींनी त्याचे अभिनंदन केले .