कडेठाण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

पाचोड/ कडेठाण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण शालेय समितीचे सदस्य विजय नारायण खरग यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, शाळेमध्ये पार पडलेल्या गणपती बनवण्याची स्पर्धेचे विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,सरपंच, उपसरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हजर होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील लीलाधर, संतोष महाजन, विलास भालेराव, विशाल देशमुख, सुरेश ताजने,राजेंद्र वाघ,चरभरे मंगल,विजय पडवळे, हरिदास मोटे,बाळू खरग,संजय वाघ आदींनी परिश्रम घेतले