बिडकिन येथे ठिकठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ आप्पा हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती व शुभहस्ते...

प्रतिनिधी

आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, जिल्हा परिषद शाळा, सरस्वती भुवन विद्यालय, भगवती विद्यालय, व सर्व खाजगी शाळा महाविद्यालय या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ आप्पा हिवाळे यांच्या हस्ते झेंडावंदन करत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सारिका मनोज पेरे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे,ग्रामसेवक अरुण गोर्डे, मंडळ अधिकारी शशिकांत ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे,पत्रकार नंदू वैद्य, नगरसेवक फिरोज सय्यद, मुख्याध्यापक चित्तोडकर सर, दाणेकर सर, राशिनकर सर, घेवंदे सर, नन्हेखा पठाण, केशव शिंदे, शैलेश तोतला, गणेश काळे, आदींसह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व सर्व पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा कार्यकर्त्या तसेच बिडकिन व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती..

रविंद्र गायकवाड, बिडकिन