सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणी परिसरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे अजिंठा लेणीवरील काही धबधबे आता वाहायला सुरुवात झाली आहे. सातकुंडावरील मुख्य धबधबा वगळता लहान-मोठे धबधबे वाहायला सुरुवात झाली आहे. यात मुख्य म्हणजे लेणी क्र. २० व २१ मधील धबधबा धो-धो वाहत होता. या धबधब्याचा आनंद पर्यटक घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने वाघूर नदीला ही जोरदार पूर आला आहे.