शिरुर: महाराष्ट्रातील एक लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता कंपनीचा १.४५ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवून लावला असल्याचा आरोप करून शिरुर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ शिरुर येथील बस स्थानकासमोर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.

वेदांता प्रकल्पामुळे राज्यातील लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु हा प्रकल्प राज्य सरकारने गुजरातला पळवून लावला असल्याचा आरोप यावेळी बोलताना शिवसैनिकांनी केला. यावेळी शिरुर-आंबेगावचे तालुकाप्रमुख गणेश जामदार,शहरप्रमुख सुनील जाधव,माजी नगरसेवक मंगेश खांडरे,ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे,शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ,अनिल पवार, युवासेना उपशहर अधिकारी स्वप्निल रेड्डी, सुनिल जठार,महेंद्र येवले,आकाश चौरे उपस्थित होते.