परभणी(प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील सोमवारी (दि.19) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता परभणी येथे त्यांचे आगमन होणार असून परभणीतील राष्ट्रवादी भवन येथे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत. तसेच रात्री 8 ते 9 या वेळेत ते परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आढावा घेतील. रात्री 9 ते 9.30 ही वेळ कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवण्यात आली असून रात्री साडेनऊ वाजता ते परभणीहुन हिंगोली कडे प्रयाण करतील. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे, खासदार फौजिया खान, परभणी जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सितारामजी घनदाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादीचे परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते आदींची उपस्थिती राहणार आहे. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष,कार्यकारणी सदस्य,तालुकाध्यक्ष,आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
दादाबाड़ी इलाके में दिनदहाड़े घर का गेट खोल कर ले गए बाइक सवार बदमाश CCTV फुटेज आया सामने
दादाबाड़ी इलाके में दिनदहाड़े घर का गेट खोल कर ले गए बाइक सवार बदमाश CCTV फुटेज आया सामने पुलिस में...
पुणे में महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यूनिट का उद्घाटन
पुणे: राज्य की राजनीति में बदलाव नजर आ रहा है। अब राजनीति में युवा नेता सक्रीय हो रहे हैं। ऐसे...
समारोह को सफल बनाने के लिए अधिकारी अपने दायित्वों का करें निर्वहन-नवरत्न कोली
स्वतंत्रता दिवस 2024 का जिला स्तरीय मुख्य समारोह 15 अगस्त को पुलिस परेड ग्राउंड पर आयोजित होगा।...
ডা°ৰামদত্ত বুজৰবৰুৱা আৰু ভূপেন শৰ্মা সোৱঁৰণী ফুটবল খেলৰ দ্বিতীয় প্ৰিকোৱাৰতাৰ ফাইনেল খেল
ডা°ৰামদত্ত বুজৰবৰুৱা আৰু ভূপেন শৰ্মা সোৱঁৰণী ফুটবল খেলৰ দ্বিতীয় প্ৰিকোৱাৰতাৰ ফাইনেল খেল আজি...