हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे सर्व भागात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असुन सर्व शेतकर्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी केली आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
जिल्हयात अतिवृष्टीमुळे सर्व भागात सारखेच नुकसान झालेले आहे. परंतु शेती पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण योग्य न झाल्यामुळे, अंदाजे नुकसानीचे आकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे काही मंडळात नुकसान भरपाई मंजुर झाली व काही मंडळे नुकसान भरपाईतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मंजुर न - झाल्याने मंडळातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करून सुधारीत प्रस्ताव शासनास पाठविण्यात यावा व सर्व मंडळाना सरसगट सारखीच मदत जाहिर करण्यात यावी अशी मागणी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या निवेदनावर फुलाजी शिंदे, हमीद प्यारेवाले, श्रीरंग राठोड, सखाराम मुटकुळे, चंद्रकांत घोरपडे, मानिक लोंढे, विजय धाकतोडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.