*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर
औरंगाबाद:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि.१६ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी. ०४.३० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.
दुपारी ०४.५५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण व राखीव.
सायं. ०५.२५ वा. विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट व राखीय, स्थळ:- सिध्दार्थ गार्डन शेजारी, औरंगाबाद. सायं ०५.३० वा. सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण.
सायं ०५.४५ वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.
सायं. ०६.३० वा. तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
रात्री ०७.१५ वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार, दि.१७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०६.३० वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण.
सकाळी ०७.०० वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम.( स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.)सका ०७.१५ वा. सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण सकाळी ०७.३५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने हैद्राबाद विमानतळाकडे प्रयाण.