अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, औंढा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा
औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा
औंढा नागनाथः- औंढा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीजन्य पाऊस झाला .प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे औंढा तालुका हा अतिवृष्टी मधून वगळला गेला आहे .औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर झटे यांच्या नेतृत्वामध्ये अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, औंढा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा या संदर्भाचे नायब तहसीलदार सचिन जोशी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.सदरील निवेदनामध्ये सविस्तर वृत्त असे आहे की,यावर्षीच्या जुलै महिन्यात औंढा नागनाथ तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होवून अतिवृष्टी झाली त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. व शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले.त्यानंतर ऑगस्ट महीना पूर्ण पावसाने दडी मारल्यामुळे उरली सुरली पिके सुध्दा वाळु लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषि व महसुल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानूसार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहणार आहेत. हयामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना विम्याचे अग्रीम 25% रक्कम तात्काळ देण्यात यावी.शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी व औंढा नागनाथ तालुका दुष्काळ सदृश्य घोषित करावा.या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर २२ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याला सोबत घेऊन शिवसेना भव्य मोर्चा