गोठा तेथे लसीकरणा वाढवण्यासाठी शिवसंग्रामचे निवेदन
बीड (प्रतिनिधि) प्रशासनाच्या भोगळ कारभार शेतकऱ्याच्या मुळावर आला आहे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे लम्पी रोगांवर नियंत्रण येत नाही. शेतकऱ्याचे पशुधन धोक्यात आले आहे.शेतकरी आपल्या शेतातील बैल,गाई, म्हशी व इतर जनावरांना पोटाच्या पोरा पेक्षा हि जास्त जपतात परंतु तेच शेतकऱ्याचे पशुधन लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आले आहे. शेतकऱ्याचे पशुधन जगले तर शेतकरी जगेल दळभद्री प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलून शेतकऱ्याच्या पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या गोठ्यात जाऊन पशूसवर्धन विभागाने बाधावर जाऊन तत्काळ लसीकरण राबवावे या मागणी साठी शिवसंग्राम अध्यक्षा डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने जिल्हाधकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या वेळी शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम सरचिटणीस सुहास पाटील, सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, जेष्ठ नेते योगेश शेळके, सरचिटणीस विनोद कवडे, युवा नेते सचिन बाप्पा कोठुळे, आनंद जाधव युवा नेते, शेतकरी तालुकाध्यक्ष अर्जुन सोनवणे , खाजाभाई पठाण,विजय डोके,सौरभ तांबे, फुलचंद सुरवसे,प्रकाश पिसाळ,दगडू गव्हाणे,अविनाश खांडेकर,अंगद माने यांच्या वतीने निवेदन देण्यात आले