लाईट गेली की जिओचे नेटवर्क ही जातेय नांदायला... 

"जिओ सिमला नेटवर्क राहत नसल्याने स्मार्ट फोनही झाले खोके"

पाचोड (विजय चिडे) मागील दोन महीन्यापासून जिओ ला नेटवर्क राहत नसल्यामुळे मोबाईलवरकॉल केल्यानंतर आपले संभाषण सबंधीत व्यक्तीच्या कानावर पडत नसल्याने सध्या पाचोड ता.पैठणसह परिसरात दिसून येत आहे. परिसरातील लाईट गेल्यावर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांने जिओ टावर(मनोरा)चे नेटवर्क गायब होत असल्यामुळं नेटवर्क फज्जा उडवल्याने जिओचे ग्राहक वैतागून गेले आहे. जिओ कंपनीने सुरुवातीला ग्राहकांना कमी पैशात मुबलक सुविधा दिल्यात त्यामुळे नागरिकांनी जिओला पसंती दर्शविली होते,मात्र गेल्या चार महिन्यात जिओ कडून सतत वाढीव दर होत आहे. मोबाईल कंपनीकडून सेवा मिळत असल्याने त्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  

दैनदिन गरजा प्रमुख यादीत आता मोबाईलने स्थान मिळवले आहे. मोबाईल कंपन्यांच्या दरात स्पर्धा कॉलिंग मागे पडून नेट पॅक ची स्पर्धा आली आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती एकएक स्मार्ट फोन आहे.त्यामूळे थोड्याथोड्या गोष्टीवर मोबाईलवर कॉल करण्याची एक प्रकारे सवय जडली आहे.लाईट गेल्यावर या सवयीला खो बसू लागल्याने मोबाइल धारकांची डोकेदुखी वाढत आहे.

सध्या पावसामूळे सतत लाईट गायब राहत असते यामुळे नागरिक आपल्या मोबाईलची जास्तीत जास्त आवश्यकता भासत असते.कुठं काही घटना घडली तर ति सांगण्यासाठी मोबाईलने दहावेळा काॅल केल्यास तेव्हा कुठे फोन लागत आहे त्यामुळे पाचोडच्या परिसरात ठिकठिकाणी जिओ कंपनीने टावर (मनोऱ्याची)उभारणी केलेली आहे. मात्र ते टावर(मनोरा) लाईट गेल्यावर टावर फक्त शोभेची वस्तूच बनून राहत आहे तर इंटरनेट सेवा तर नावापुरतीच राहील कि काय ?असे या परिसरातील गावांमधील नागरिकांना वाटते.कितीही प्रयत्न केला तरी नेट उघडता उघडत नाही.जिओ चे मोबाईल सेवेत सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस कुचकामी ठरत असल्याने ग्राहकांची नेट पॅक कोणत्याही कामी न येता वाया जात असल्याचे नागरिकांतून बोले जात आहे.लाखाचे मोबाईल हातात असुन ही मोबाईल नेटवरची साथ मिळत नसल्याने स्मार्टफोनचा डब्बा फोन झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून ही समस्या सुरू असल्याने ग्राहकाकडून सांगण्यात येत आहे. अनेक मोबाइल कंपन्याचे मर्जिंग सुरू आहे.एकमेकांच्या टॉवराना जोडण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नेटवर्क मध्ये अडचण येत असल्याचे कंपन्यांकडून ग्राहकांना सांगण्यात येत आहे. परिसरातील अचानक मोबाईलचे नेटवर्क गायब झाले की अनेक वेळा फोनच लागत नाही. लागला तरी ऐकायला येत नाही. फोन मध्ये अचानक बंद होत आहे .तसे फोन सुरू असूनही त्यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही. मोबाईल मध्ये फुल नेटवर्क दाखवत असताना देखील प्रत्यक्षात फोन लागत नाही. नेटवरच्या संबंधित अशा असंख्य समस्यांना ग्राहक हैराण झाले आहेत.

चौकट- सध्या जिओ मध्ये अडचण येत आहे.मात्र आता तर फोनच लागत नाही. इंटरनेट सेवाही स्पीड नाही. महत्त्वाच्या कामासाठी फोन लागत नाही.त्यामुळे महत्त्वाच्या कामांना खोळंबा होत आहे.याबाबत संबंधित कंपनीने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.

अंगद लेंभे-ग्राहक

चौकट- इंटरनेटही विस्कळीत.

सध्या मोबाईल तर फोन केवळ फोन करण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. मोबाईल इंटरनेट त्यामुळे स्मार्ट फोनही आता डब्बा फोन झाला आहे. नेट व्यवस्थित रित्या चालत नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारावरती ही याचा विपरीत परिणाम चांगलाच पडत आहे. नेट व्यवस्थित रित्या चालत नसल्याने ऑनलाइन देवाण-घेवाण ही यामुळे ठप्प झाली आहे. याकरिता संबंधित कंपनीने नेट सुविधा लवकरात लवकर सुरू करावी.

शिवाजी पाचोडे,ग्राहक सेवा केंद्र चालक,