लम्पि स्किन या आजाराबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने भित्तीपत्रक तयार केले असून, या भित्तीपत्रकाचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) सूरबा नाना टिपणीस सभागृहात करण्यात आले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे संशयित जनावरे जिल्ह्यात सापडली आहेत. या जनावरांचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लम्पी स्किन हा त्वचेचा आजार असून, त्याच्या लक्षणांविषयी जनजागृती करण्यावर भर दिला जात असून, पशुसंवर्धन विभागाने जनजागृतीपर भित्तीपत्रक तयार केले आहे.
या भीत्तीपत्रकात लम्पी आजाराची लक्षणे, आजाराची कारणे, आजाराचा प्रसार, नियंत्रण, पशुपालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
भित्तीपत्रक अनावरण प्रसंगी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, कृषी अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
..................