शिरुर: शिरुर तालुक्यातील जनावरांच्या लम्पी स्किन आजाराबाबत बुधवार (14) आमदार ॲड अशोक पवार यांनी संबंधित प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या आजारापासून तालुक्यातील जनावरांचा बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख , पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ धर्माधिकारी, तहसीलदार प्रशांत पिसाळ , जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ शितल कुमार मुकणे, गटविकास अधिकारी अजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.