कापूस पिकावर हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम.

अशोक छपरे 

जिंतूर: जिंतूर तालुक्यात मान्सून पासून सुरु झालेल्या पावसाने जुन,जुलै महिन्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता.त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 20 ते 21 दिवस पावसाचा खंड पडला होता.त्यादरम्यान कडक ऊन पडल्याने परिसरातील मध्यम व हलक्या जमिनीवर सोयाबीन ,कापूस पिके सुकली होती.परिणामी बऱ्याच शेतकरी आणि लोकप्रतिनिधिनी ही बाब शासनाच्या निदर्शनी आणून देऊन अतिवृष्टी व पावसाच्या खंडाने ने झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करून पिक विमा कंपनी कडून 25%अग्रीम नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.गेल्या आठ दहा दिवसापासून पुन्हा भाग बदलत वाऱ्यासह जोराचा पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण व हवामान बदलाचा कापूस पिकावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे.सध्या कापूस फुल, पाते व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पाते गळ होने,पाने लाल होऊन कोकडा पडणे अशा रोगाने कापूस उत्पादन घटण्याची चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.