"किसान रेल्वे" ने शेतक-यांच्या अर्थिक विकासाला चालना मिळेल

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो परंतु गेल्या पाच वर्षापासून तालुक्यातील शेतकरी अधुनिक पध्दतीने शेती करत असल्याने मोठ्या प्रमाणावर फळबाग,भाजीपाला लागवड होत आहे.आता आष्टी तालुक्यातील शेतक-यांच्या कष्टाचे चिज होणार आहे.आष्टी-अहमदनगर पॅसेजंर रेल्वेचा मूहूर्त दि.२३ संप्टेंबर रोजी ठरला. पण याठिकाणाहून शेतक-यांच्या शेती मालाला भाव मिळण्यासाठी "किसान रेल्वे" सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.

लाॅकडाऊननंतर रेल्वे विभागाने देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अन् तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि १५ दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला.

आता अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गचे आष्टीपर्यंत काम पुर्ण झाले आहे.अहमदनगर-आष्टी ही पॅसेजंर रेल्वे येत्या दि.२३ सप्टेंबर रोजी रेल्वेमंञी अश्वीनकुमार यांच्या हस्ते होणार आहे.आष्टी तालुक्यात दिड लाख हेक्टर जमिन आहे.१ लाख २५ हजार हेक्टर जमिम पेरणी युक्त आहे.यातून शेतकरी अधुनिक पध्दतीने शेती करून डाळींब,लिंबू,फुलकोबी,मिश्र भाज्या,मिर्ची,कॅप्सिकम,आले, कांदे,लसूण आणि विशेष म्हणजे सफरचंदचीसुध्दा लागवड आष्टी तालुक्यात केली आहे.आता जर आष्टी येथून किसान रेल्वे सुरू करण्यात आली तर मराठवाडाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.शेतकऱ्यांसाठी किसान लाइफ चेंजर सिद्ध होईल.तसेच शेतकरी,व्यापारी,बाजार समिती,लोडर्स यांना जास्त प्रमाणात माल पाठविता येईल.किसान रेल्वेमुळे नाशवंत शेती वस्तू भारताच्या विविध भागात पोहचवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.सध्या शेतकरी रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहेत.जर किसान रेल्वे सूरूझाली तर शेतकरी कमी वेळ व पैशात देशभरात नाशवंत व शेती माल पोहचवता येऊ शकतो.या रेल्वेमुळे आष्टी,जामखेड,कर्जत,पाथर्डी, पाटोदा,शिरूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे आणि इतर वस्तूंच्या अधिक उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळत आहे.नाशवंत वस्तूंसाठी राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी,दूध, मांस आणि मासे यांचा समावेश आहे.किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशभरात पोहचविल्या जातील.यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. छोटे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या गरजा भागविणारी ही गाडी आष्टी येथून सुरू करण्याची मागणी शेतकरी नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगीतले.