अमरावती अंबादेवी व एकविरा देवी नवरात्री उत्सवाच्या वेळी मनपा द्वारे दुकानाच्या मागणीची संख्या वाढणार असूनयावेळी मनपानेप्रशासनाने हराशिएवजी जास्त दराचे निविदा कोटेशन मनपा प्रशासनाच्या द्वारे निविदा प्रक्रिया मागविण्यात येत आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे. अंबादेवी एकविरादेवी नवरात्री उत्सवाच्या दरम्यान या मार्गावर एकूण 151 खुले प्लॉट व्यवसायकरिता व्यावसायिकांना वितरित करण्यात येणार आहे. यामधून मनपा प्रशासनाला अंदाजे 9 ते 10 रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
अंबादेवी एकविरादेवी मंदिराला प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असल्याने येथे दहा दिवसीय नवरात्रीउत्सव अंबानगरीत आयोजित होत असते. विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून आई अंबादेवी एकविरादेवी चे भाविक भक्त लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असतात. यात्रेत स्टॉल मिळविण्यासाठी जिल्ह्यातून व्यावसायिक प्लॉट करिता जास्त मागणी करीत आहेत.