भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर , राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने आद. सिद्धार्थ दा. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यातील ज्या धम्म बांधवांनी आपले जीवन बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना अनुसरून वाहून नेले अशा धम्मबांधवांचा मालेगाव शाखेच्या वतीने गुणगौरव व सत्कार करण्यात येणार आहे यापैकीच एक आद. नारायण शिवराम डोंगरदिवे वय ६३ वर्षे व त्यांची पत्नी सौ. लक्ष्मी नारायण डोंगरदिवे वय ६० वर्षे रा.वाघळुद ता.मालेगाव जिल्हा वाशिम या डोंगरदिवे दापत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जवळजवळ ३० वर्ष आंबेडकर चळवळीसाठी वाहून नेले त्यांनी आपल्या जीवनामध्ये धम्म प्रवचनाच्या माध्यमातून त्यांच्या राहत्या घरापासून सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी गावांमध्ये वर्षवासामध्ये बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे पठण करून आपल्या गावातील सर्व धम्म बांधवांना धम्म आचरणाचे धडे दिले सोबतच त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला बुद्ध विहारांमध्ये बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनार मार्गदर्शन केले त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या खेडोपाडी जाऊन साक्षी गंधाचे कार्यक्रम लग्न विधीचे कार्यक्रम हे नेहमी बौद्ध धम्म नियमाप्रमाणे पार पडत असतात आपल्या गावामध्ये वर्षातून दोन ते तीन वेळेस बौद्ध भिकू यांचे प्रवचन सुद्धा घेण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात त्यांनी वारंवार अंधश्रद्धेबद्दल व्यसनमुक्ती बद्दल स्वच्छते बद्दल गावातील धम्म बांधवांना वारंवार मार्गदर्शन केले आणि स्वतः श्रामनेर सुद्धा झाले आहेत आज भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचीटनीस राहुल वानखेडे व ता.उपाध्यक्ष विलास जी गुडदे यांनी त्याच्या कार्याचा अहवाल घेतला आहे लवकर मालेगाव शाखेच्या वतीने त्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं