अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे करा - अपर्णा गीते
औरंगाबाद,(विजय चिडे) : अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे कराव्यात. सर्व विभागांनी केलेल्या कारवायांचा दरमहा अहवाल पोलिस आयुक्तालयास पाच तारखेपूर्वी सादर करण्याच्या सूचना पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक श्रीमती गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, राज्य उत्पादक शुल्क विभागाचे ए.जे. कुरेशी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ब.दा. मरेवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक पी.आर.देशमुख, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, अपर तहसीलदार विजय चव्हाण, सायबर विभागाचे गौतम पातारे उपस्थित होते.
अंमली पदार्थ विरोधी कारवाया अन्न व औषध प्रशासन, कृषी, महसूल विभागांनी कराव्यात. जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना श्रीमती गीते यांनी दिल्या. श्री.आघाव, श्री.ढुमे, श्री. देशमुख, श्री. मरेवाड यांनीही विविध सूचना केल्या.