लातूर रोड मार्गे जळकोट मुखेड बिलोली बोधन रेल्वे मार्ग निर्माण व्हावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे या मागणीचा पाठपुरावा आमदार संजय बनसोडे यांनी सुरू केला आहे यापूर्वीही हा मार्गाची पाहणी झालेली आहे सदरील मार्ग हा 130 किलोमीटर अंतराचा असून या रेल्वे मार्गावर कुठेही नदी पर्वत किंवा आठवड्याचे ठिकाण नसून सरळ मार्ग आहे या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेच्या हितासाठी हा दोन जिल्ह्याचा पाच मंडळांना जोडणारा रेल्वे मार्ग सुरू करावा या उद्देशाने उदगीरचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी  रेल्वेमंत्री ना अश्विनीजी वैष्णव यांची भेट घेऊन या मार्गाला तात्काळ मंजुरी द्यावी आणि तशी तरतूद देणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये नोंद करावी अशी विनंती केली आहे लातूर रोड ते बोधन या रेल्वे महा लाईन मुळे व्यापारी शेतकरी विद्यार्थी गोरगरीब जनता या सर्वांचे भले होऊन ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच रेल्वेला देखील या मार्गामुळे चांगला आर्थिक फायदा मिळणार आहे या पार्श्वभूमीवर चा विचार करून हा रेल्वे मार्ग जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मंजूर करावा या रेल्वे मार्गासाठी दिल्ली येथून काही खासदारांनी एका समितीमार्फत प्रत्यक्ष जळकोट येथे येऊन पाहणी केली होती तसेच या रेल्वे लाईनच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि नियोजनाचे पूर्ण दस्ताऐवज माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिले होते ते रेल्वे भवानी येथे आहेतच तरी कृपा करून सदरील रेल्वे लाईन मंजूर करून येणाऱ्या बजेटमध्ये त्यांची नोंद घ्यावी आणि तशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली जावी अशी ही विनंती उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी रेल्वे मंत्राकडे केले आहे यासोबतच बिदर ते पुणेही रेल्वे नियमित केली जावी दररोज ही रेल्वे झाल्यास या भागातील जनतेला याचा फायदा होणार आहे त्यासोबतच या रेल्वेसाठी स्वतंत्रपणे एक सामान्य डब्बा एक स्लीपर कोच आणि एक रिझर्व कोच अशा सर्व प्रगती प्रयोगातील लोकांसाठी आगावचे डबे जोडावे अशी ही विनंती आमदार संजय बनसोडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव यांच्याकडे केले आहे याप्रसंगी अमोल बिराजदार पाटील कोळखेडकर बसवराज पाटील नागराळकर हे देखील उपस्थित होते