चोरट्याचा मंदिराच्या दानपेटीवर डल्ला ३० हाजारासह दानपेटी लंपास गोंडाळा येथील वंशेश्वर मंदिराची घटना अज्ञातावर औंढा ठाण्यात गुन्हा नोंद
औंढा नागनाथ तालुक्यातील गोंडाळा येथील वंशेश्वर संस्थान मंदिराची दानपेटी चोरट्याने पळवली असून याबाबत मंदिराचे पुजारी मनमत स्वामी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गोंडाळा येथील वंशेश्वर देवस्थान मंदिर गावालगतच असून या मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळून नेल्याची घटना घडली आहे त्यामुळे मंदिराचे पुजारी मनमत स्वामी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे .यावेळी गावातील केशव शिंदे सुभाष कोळेकर केशव शिंदे गजानन घोशीर यांची उपस्थिती होती. या दानपेटीत तीस हजार रुपये असल्याची तक्रारीत म्हटले आहे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बापूराव चव्हाण पुढील तपास करत आहेत.