औरंगाबाद:- दि.१२ स.(दीपक परेराव)राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल औरंगाबादेत पैठण येथे कार्यक्रमासाठी आले असता मराठा क्रांती मोर्च्यांच्या वतीने त्यांना औरंगाबाद विमानतळावर भेटून आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले.

निवेदनात त्यांनी महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये नांदेड, ठाणे, ग्रामीण मुरबाड, पैठण,तालुका तसेच ईतरही जिल्हामध्ये कुठलाही शासनाचा निर्णय नसताना कुठल्याही न्यायालयाचा आदेश नसताना परस्पर मनमानी कारभार करत आहे. 

तहसीलदारांनी मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यात येऊ शकत नाही असे चुकीचे विधान करत त्यांना अधिकारापासून वंचित ठेवले आहे. 

जोपर्यंत मराठा तरुणांना हक्काचा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा तरुण ईडब्ल्यूएस आरक्षण भाग घेऊ शकतात ही साधी सरळ सोपी गोष्ट असतानादेखील अधिकारी दबंगगिरी करत आहे असा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांनी विनंती केली की, तात्काळ आपण राज्याच्या मुख्य सचिवांना आदेशित करावे व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी सूचना कराव्यात यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात येऊन तात्काळ अंमलबजावनीची अपेक्षा या वेळी त्यांनी व्यक्त केली या वेळी मराठा आरक्षण याचिका कर्ते विनोद पाटील, रविंद्र काळे पाटील, सचिन मिसाळ पाटिल,अशोक मोरे पाटिल, रमेश गायकवाड पाटिल,गणेश ऊगले पाटील आदींची ऊपस्थीती होती.