हिंगोली प्रतिनिधि/ गोपाल सातपुते

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे मागील सात वर्षापासून जिल्हा परिषद शाळेवर शिक्षकाची पदे रिक्त असुन येथील शाळेत शिक्षकांची चौदा पदे मंजुर असुन एकुण १२०० विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र शाळेवर मागील अनेक वर्षापासून 5 शिक्षक शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोरेगाव हिंगोली जिल्ह्याची राजकिय राजधानी असुन याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मात्र आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी गोरेगाव येथील शाळेचे विद्यार्थी व पालकांनी सुभाष कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील यांची भेट घेतली यावेळी भिसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैनै यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवून प्रशासनाला जाब विचारला व तात्काळ शिक्षकांची नियुक्ती न केल्यास जिल्हा परिषदेचे कार्यालय फोडू असा ईशारा अधिकारी यांना देताच प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन सात शिक्षकाची नियुक्ती केली.