चक्क विद्यार्थ्यांनी भरविली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा
हिंगोली जिल्हा परिषदे मध्ये आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सेनगांव तालुक्यातील गोरेगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातच शाळा भरविली आहे. गोरेगांव जिल्हा परिषद शाळेमध्ये 549 विद्यार्थी शिक्षण घेत असून सदर शाळेमध्ये फक्त 5 शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे शिक्षकांची रिक्त असलेली 12 पदे भरण्यासाठी आज जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळा भरवली आहे. तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी गांवकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचे आश्वासन दिले आहे.अनेक वेळा मागणी करूनही शिक्षक उपलब्ध करून दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगांवकर,माजी सभापती संजय देशमुख,माजी सभापती रूपालीताई पाटील गोरेगांवकर,शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांच्यासह विद्यार्थी, व गावकऱ्यांची उपस्थिती होती.