शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन
औंढा नागनाथः- हिंगोली जिल्हा या ठिकाणी शिवसेनेचा जाहीर मेळाव्याप्रसंगी आमदार भास्करराव जाधव आले असता त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन दुग्धाभिषेक केला. यावेळी त्यांच्यासोबत हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात ,मा.खासदार सुभाष वानखेडे ,मा आमदार संतोष टारफे, मा. आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा,जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, जिल्हा हिंगोली संघटक बाळासाहेब मगर, गोपू पाटील ,संदेश देशमुख,अजित मगर, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे ,तालुकाप्रमुख गणेश देशमुख, ज्ञानेश्वर झटे ,श्रीशैल्य स्वामी, बंडू चौंढेकर , राजू मुसळे,बापुराव घोगडे , सुनील खंडागळे, अलीम खतीब, मधुकर गोरे, नागेश गोरे,नागनाथ रेणके,प्रशांत मगरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भास्करराव जाधव यांचे औंढा नगरीमध्ये आगमन होतात फटाक्याची आतिषबाजी करून शिवसैनिकाकडून जल्लोषात त्यांचा गुलाब पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच नागनाथ मंदिरात देवस्थानच्या वतीने नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन आमदार भास्करराव जाधव यांचा सत्कार केला. त्यानंतर ते हिंगोली येथे असलेल्या शिवसैनिकाच्या मेळाव्याला रवाना झाले.