अखेर...! तलाठ्यानेच शेतकऱ्याला तारले... जिंतूर: तालुक्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेत ५७ हजार ५०० शेतकऱ्यांचा समवेश झाला असून, यासंदर्भातील डेटा ऑनलाईन अपलोड करण्याचे काम महसूल विभागातील तलाठी यांनी केवळ १० दिवसांत पूर्ण केले आहे. सणासुदीची सुट्टी न घेत विशेषता या दहा दिवसांमध्ये गौरी गणपती उत्सव असे सण असून महिला कर्मचाऱ्यांसह अहोरात्र एक करून फक्त तलाठी यांनीच हे काम अल्पावधीत पूर्ण केल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या कालावधीत दोन हजार रुपये दिले जातात. त्यानुसार वर्षाला एकूण ६ हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने काही नियम घालून दिले आहेत. असे असताना अपात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. या योजनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी हि विभागाची देखील आहे; आणि इतर जिल्ह्यात सदरील काम हे विभागून कृषी आणि महसूल या विभागात विभागून देण्यात आले आहे परंतु जिंतूर तालुक्यात हे काम महसूल विभागातील तलाठी यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानुसार तलाठी यांनी लाभार्थी शेतकऱ्याचा डाटा गोळा करून तो ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी १० दिवसांत यशस्वीरीत्या पार पडली. *चौकट* "जमिनीचे क्षेत्र, ८ अ चां खाते क्रमांक, फेर फारचा प्रकार व दिनांक अशा प्रकारची माहिती जमा करून ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करण्यात आले. गेल्या १० दिवसांत सुट्टी न घेता, २२ तलाठी यांनी माननीय उपविभागीय अधिकारी सेलू, श्रीमती अरुणा संगेवार व मा. तहसिलदार सखाराम मांडवगडे जिंतूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहो रात्र जागून हे काम पूर्ण केले, अशी माहिती मिळाली