पाथरी:-जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून गेली असुन खरिप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत २५ % विमा अग्रीम व एनडीआरफ च्या निकषाने मदत करावी अशी मागणी वाघाळा येथील सरपंच बंटी घुंबरे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे .

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

सोमवार १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , वाघाळा गाव पाथरी मंडळामध्ये येत असून ते पाथरी पासुन दक्षिणेश 18 किमी आहे . तर बाभळगाव मंडळा पासुन 5 किमी अंतरावर आहे . जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस , तुर , मुग , पिके पिवळी पडून समाधानकारक वाढ झाली नाही नंतर ऑगस्ट महिन्यात 25 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे वरील पिके सुकून गेली आहेत . त्यात पिकाचे नजरी 60 ते 70 टक्के नुकसान झाले आहे . यामुळे शेतकर्यावर अस्मानी संकट आले असुन शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला आहे . प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकर्याना एन डी आर एफ ( NDRF ) च्या तीन हेक्टर च्या मर्यादेत पंचनामे करून विमा कंपनीला 25 % टक्के अग्रिम रक्कम देण्यास भाग पड़ावे अशी करण्यात आली आहे .

दिलेल्या निवेदनावर सरपंच बंटी घुंबरे , विजयकुमार घुंबरे ,पद्माकर मोकाशे ,दत्तराव नागमोडे यांच्यासह वाघाळा येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .