परळी (प्रतिनिधी) परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद करण्यात आलेल्या संच क्र.3 ची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली, राख ओकत असली तरी या चिमणी सोबत परळी येथील नागरिकाचे जुने नाते आहे,आज आपल्या समोर ही चिमणी पडत असताना अनेकांना दुःख होत होते,परळी ही ओळख आज पुसली गेली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 210 मेगापॅट वीज निर्मिती करणाऱ्या संच क्रमांक तीन मधील धूर ओकणारी चिमणी आज पाडण्यात आली सुमारे 25 वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी कोळसा जाळला जात होता त्यातून होणाऱ्या धुरासाठी ही चिमणी तयार करण्यात आली होती संच क्रमांक तीन पूर्णपणे बंद करण्यात आल्यानंतर त्यातील साहित्य बाहेर काढण्याचे काम सध्या चालू आहे आज या कामांतर्गत सदरची चिमणी जमीन दोस्त करण्यात आली. शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीने संच क्रमांक तीन पूर्णपणे रिकामा करण्याचे काम हाती घेतले आहे वर्षभरापासून हे काम चालू असताना आज अखेरच्या टप्प्यात चिमणी जमीन दोस्त करण्यात आली परळी 20 केंद्र म्हटले की नेहमी दिसणाऱ्या तीन चिमण्या अशी ओळख होती आज ही ओळख पुसली गेली असून इतर दोन संच भंगार मध्ये काढण्याची प्रक्रिया चालू आहे मागील अनेक दिवसापासून दूर होणाऱ्या या चिमणी सोबत येथील अधिकारी कर्मचारी अभियंते एवढेच नाही तर सामान्य परळीकर यांचे नाते जोडले गेले आहे प्रत्यक्ष दर्शीने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी नऊ वाजता ही चिमणी पाडण्यात आली चिमणी पडताना चा व्हिडिओ समाज माध्यमात आला आहे या व्हिडिओत काही सेकंदात चिमणी खाली पडतानाचे दृश्य कैद झालेले आहे