औरंगाबाद :- (दीपक परेराव )शिंदे गटातील सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या निकटवर्तीय समजाणारा ज्योतिराम घोंगडे -पाटील याच्यावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गर्भपात करण्यासह सात कलमांद्वारे गुन्हा दाखल झाला असून ज्योतीराम ने सुरूवातीला 3 लाख रुपये घेतले. त्यानंतर महागडे मोबाईल व 35 लाख रुपयांचे दागिने घेतले. ब्रेझा व स्कॉर्पिओ गाडी घेऊन पिडितेला हप्ते भरण्यास सांगितले. क्रेडिट कार्डचे हप्ते देखील पिडितेला भरण्यास सांगितले. असे त्याने मला वारंवार ब्लॅकमेल करुन जवळपास दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप पिडितेने केला आहे. ज्योतीराम पूर्वी युवासेनेचा शहरप्रमुख होता. नुकत्याच झालेल्या गणपती महोत्सवात अनेक बडे पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्याचा वावर पहायला मिळाला. सेनेत फुट पडल्यानंतर मोठ्या नेत्यांसह त्याने शिंदेगटात प्रवेश केला. क्रांतीचौकात मुख्यमंत्र्यांच्या सत्कारात तो अग्रगणी होता. स्वत:चा युवा मंच असल्याने ज्योतीराम सोशल मिडियावर प्रसिध्दीच्या झोतात रहायचा. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना, युवासेनेत मात्र चर्चाला उधाण आल्य.

पुर्वाश्रमीचा युवासेनेचा पदाधिकारी व सद्याच्या शिंदेगटाचा कट्टर समर्थक ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील याने विवाहितेला लग्नाचे आमिष दखवून अत्याचार केले. त्यातून पिडितेकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळून ती गर्भवती राहताच गर्भपात करुन नंतर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजळनक प्रकार समोर आला आहे.

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पिडितेने तक्रार दिल्यानंतर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गर्भपात करण्यासह सात कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडितेने तक्रारीत केलेल्या म्हटल्यानुसार, ज्योतीराम पाण्याच्या टँकरचा व्यवसाय करतो. त्यातून त्याची पिडितेसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले व दोघांमध्ये भेटीचे सत्र वाढत गेले. त्यातच पिडिता कौटूंबिक कलहात असल्याने ज्योतीराम ने त्याचा फायदा घेत 2019 पासून तीला लग्नाचे आमिष दाखवून विविध पंचतारांकित हॉटेल मध्ये नेत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्या दरम्यान खासगी क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन त्याआधारे ब्लॅकमेल करुन त्याने rतिच्याकडून सातत्याने पैसे उकळण्यास सुरूवात केली.

या दरम्यान पिडिता गर्भवती राहिली. त्यातून ज्योतीरामकडून मला मुलगी झाल्याचा दावा पिडितेने तक्रारीत केला आहे. त्यातून पिडितेने पहिल्या पतीपासून रितसर घटस्फोट घेतला. त्यानंतर पिडिता गर्भवती राहिल्यानंतर ज्योतीरामने पहिले गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. 2 मार्च रोजी गर्भवती असतानाच त्याने मारहाण केल्याने त्यात दुसऱ्यांदा गर्भपात झाला. परंतू मी राजकारणात आहे, मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही, असे सांगून त्याने लग्नास थेट नकार दिला. 10 सप्टेंबर रोजी पिडितेने त्याला कॅनॉट परिसरात भेटण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडितेने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जाऊन निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.