मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
औरंगाबाद: शैलेंद्र खैरमोडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी नियोजनाची संयुक्त पाहणी केली. औरंगाबाद विमानतळ, पैठण येथील नाथ मंदीर, मुख्य सभेचे ठिकाण (कावसानकर स्टेडिअम, पैठण), पाचोड ते औरंगाबाद विमानतळ या मार्गाची पाहणी करुन जिल्हाधिकारी यांनी रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.