शिवसेनेच्या औंढा तालुका अध्यक्षपदी गणेश देशमुख यांची निवड,शहरांमध्ये फटाक्याची अतिषबाजी करून जल्लोष

 औंढा नागनाथः- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने औंढा नागनाथ तालुका शिवसेनेच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी गणेश देशमुख तर शहर प्रमुख पदी बंडू चौंढेकर यांचे निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल औंढा नागनाथ शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे.यावेळी तालुकाप्रमुख गणेश देशमुख यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे ,अनिल शिंदे, सुनील खंडागळे, गजानन सोळंके, प्रवीण कोकडवार ,मधुकर गोरे, विष्णू जाधव ,शरद पोले, राम सोळंके, मुंजाजी टोम्पे, सतीश सोळंके, अक्षय शेळके ,मल्हारी पानबुडे, शेख आसिफ ,प्रशांत मगरे ,विष्णू जाधव ,रमेश कदरे आदी शिवसेना कार्यकर्ते यावेळी हजर होते.