जळकोट येथे माध्यमिक शिक्षण विभाग लातूर महात्मा फुले पब्लिक स्कूल जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय रोहित कळसे यांच्या स्मरणार्थ मी  रोहित भव्य  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा चे उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते महात्मा फुले शैक्षणिक संकुल येथे संपन्न झाले याप्रसंगी उपस्थिताना संबोधित करताना संजय बनसोडे असे म्हणाले की कला ही व्यक्तीला अजरामर करते तसेच स्पर्धाही प्रयत्नशील माणसाला नेहमीच यशाच्या शिखरावर नेऊन बसवते त्यामुळे माणूस मोठा होतो रोहित कळसे हा आज आणि उद्या आपल्या स्मरणात राहणार आहे तो त्यांच्यातील असलेल्या अंगभूत कलेमुळे तो अष्टपैलू विद्यार्थी म्हणून नेहमीच आदर्श राहीला लहान वयात एवढी मोठी कीर्ती खूप कमी व्यक्तींना लाभते त्यापैकी रोहित हा एक होता त्यांच्या जयंतीनिमित्त आज होऊ घातलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तो माहीर होता त्यांच्या पालकांनी रोहित ज्या क्षेत्रात अग्रेसर होता त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा ठेवावी आज होऊ घातलेले हे पहिले पुष्प अविरत चालू ठेवावे असे आवाहन केले यावेळी मंचावरून तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी विद्यार्थी नेहमीच शिक्षकांच्या आवडीचा असतो रोहित हा तर सर्वांच्या आवडीचा होता त्यांच्या कला ह्या भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन केले प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष मनमत आप्पा खेडे यांनी लोहार व्यवसाया करिता शिक्षणाच्या माध्यमातून एका चांगल्या दिशेने कुटुंबाला नेण्याचे काम रोहितचे आजोबा धोंडीराम कळसे यांनी केले त्यामुळे रोहित कुटुंब एका चांगल्या दिशेने वाटचाल करीत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो पण रोहित अल्पावधीतच गेला हे दुःख कधीही न विसरण्यासारखे आहे असे प्रतिपादन केले जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जवळ पास निलंगा लातूर चाकूर उदगीर अहमदपूर कंधार मुखेड अशा तालुक्यातून विद्यार्थी उपस्थित होते या स्पर्धेत माध्यमिक गटात लातूर रोडची विद्यार्थिनी प्रथम जानवळ येथील द्वितीय आणि उदगीर येथील तृतीय क्रमांक मिळवला प्राथमिक गटात प्रथम शेंडगे अथर्व उदगीर येथील द्वितीय आणि द्वितीय वाढवणा येथील विद्यार्थ्यांनी घेतला सर्वांना रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि श्यामची आई हे कादंबरी भेट हरिभक्त पारायण प्रबोधनकार महाराज पुणेकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील नागरगोजे तहसीलदार सुरेखा स्वामी गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, प्रभावतीताई कांबळे नगराध्यक्ष नगरपंचायत, मनमत आप्पा किडे उपनगराध्यक्ष नगरपंचायत जळकोट, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे मारुती पांडे गटविकास अधिकारी बबन बोकाडे माजी गटशिक्षणाधिकारी जीडी कळसे विठ्ठल चव्हाण नगरसेवक एडवोकेट तात्या पाटील गोपाल कृष्ण गबाळे नागनाथ भाऊ शेटे संजय देशमुख विवेकानंद देवशेट्टी गोविंदा संदीप डांगे महेश धुळशेट्टी, विनायक डांगे ,किरण पवार , हा.भ.पा प्रबोधन महाराज पाळेकर प्राचार्य प्राचार्य संजय नागरगोजे प्राचार्य चंद्रकांत बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एमजे वाघमारे यांनी केले