चंद्रपूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अध्यक्ष राज साहेब ठाकरे येत्या 20 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात मुक्कामी येत आहेत. मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे येत्या १८ सप्टेंबर रोजी नागपूरला येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये राजसाहेब ठाकरे चंद्रपूर तसेच अमरावती जिल्ह्यांना भेट देऊन चर्चा करणार आहेत. १८ आणि २३ सप्टेंबरपर्यंत राज ठाकरे विदर्भात असतील. त्यांचे 18 आणि 19 रोजी त्यांचा नागपुरात मुक्काम राहणार आहे. 20 सप्टेंबर रोजी ते चंद्रपूरला येणार असून मुक्काम असेल. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी ते अमरावती येथे असतील आणि 23 सप्टेंबर रोजी मुंबईला जातील.
महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे एकत्रित लढणार असल्याचे जवळपास ठरले आहे. याची चाचपणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे विदर्भात येत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हल्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी महापालिकेची निवडणूक भाजप-मनसे एकत्र लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सोबतच चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती आहे.