वाशिम शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला खासदार भावना गवळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवशंकर मंडळाचा मानाचा गणपतीचे आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.दोन वर्षांनंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात असून, गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे. विसर्जनपूर्वी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन केले. तसेच जेसीबीच्या मदतीने गणपती बाप्पा आणि छ.शिवाजी महाराज यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

 

दरम्यान, यंदा 31 गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार असून,शहरातील मुख्य चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर बालाजी देवतलाव येथे विसर्जन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. यंदा निर्बधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी एकोप्याने हा उत्सव साजरा करावा असे खासदार भावना गवळी यांनी यावेळी सांगितले